उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा आणि ताजेपणा देणारी फळे खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि पोषक तत्वांचीही हानी होते. अशा वेळी, योग्य फळांचे सेवन केल्यास शरीर हायड्रेटेड राहते आणि ऊर्जा टिकून राहते. दररोज किमान दोन प्रकारची फळे खाण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात मिळणाऱ्या ५ सर्वोत्तम फळांबद्दल आणि त्यांचे फायदे.
१. कलिंगड (Watermelon)
उन्हाळ्यात कलिंगड खाणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पोटात थंडावा जाणवतो. हे फळ शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स देखील प्रदान करते.
२. संत्रे (Orange)

उन्हाळ्यात संत्र्याचे सेवन केल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो. तसेच, संत्र्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. संत्र्यामध्ये सुमारे ८०% पाणी असते. तुम्ही संत्र्याचा रस पिऊ शकता किंवा ताजे संत्रे खाऊ शकता.
३. आंबा (Mango)
उन्हाळा आला की फळांचा राजा आंब्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. आंबा केवळ चवीलाच उत्तम नसतो, तर पोषणमूल्यांनीही परिपूर्ण असतो. अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असलेला आंबा मॅंगनीज, कॅल्शियम, सेलेनियम आणि लोह यांसारखे पोषक तत्वे देतो. कच्च्या कैरीचे पन्हे उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय आहे, तर पिकलेल्या आंब्याचा रसही पौष्टिक आणि स्वादिष्ट असतो.
४. द्राक्षे (Grapes)

द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, सोडियम आणि इतर खनिजांसोबतच जीवनसत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. द्राक्षे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासोबतच शरीराला थंडावा देतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने ती शरीराला ऊर्जा देखील देतात. त्यामुळे उन्हाळ्यात द्राक्षे किंवा त्यांचा रस पिणे खूप फायदेशीर ठरते.
५. आलुबुखार (Plum)
आलुबुखारामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या फळात असलेले व्हिटॅमिन सी उन्हाळ्याच्या दिवसात संक्रमणापासून आपले संरक्षण करते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास शरीर थंड राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
उन्हाळ्यात या पाच फळांचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भासणार नाही आणि उष्माघाताचा त्रासही कमी होईल. वाढत्या तापमानामुळे आपले शरीर मजबूत ठेवणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्या शरीराला मजबूत बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या फळांचे नियमित सेवन केल्यास शरीर हायड्रेटेड राहते आणि दिवसभर ऊर्जा मिळते.


